नवी दिल्ली - अनेकदा मोबाईल हरविला अथवा चोरी झाल्यास काय करावे, असा प्रश्न वापरकर्त्यासमोर उभा राहतो. मात्र हा प्रश्न आधुनिक तंत्रज्ञाने सरकार सोडविणार आहे. सीईआयआर यंत्रणेतून चोरी झालेल्या मोबाईलच्या सर्व सेवा बंद करता येणार आहेत. विशेष म्हणजे सीमकार्ड अथवा आयएमईआय बदलला तरी हे करणे शक्य होणार आहे.
चोरी गेलेल्या मोबाईलमधील सीम कार्ड काढले अथवा आयएमईआय क्रमांक बदलला तरी मोबाईल शोधून काढता येणार आहे. त्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सकडे (सी-डॉट) सुसज्ज असे आधुनिक तंत्रज्ञान आहे. या सेवेचा ऑगस्टमध्ये शुभारंभ करण्यात येणार आहे.
दूरसंचार विभागाने मोबाईल फोन ट्रॅकिंग प्रकल्प पूर्ण केला आहे. यामध्ये देशातील मोबाईल हे सेंट्रल एक्विपमेंट आयडिंटी रजिस्टरमध्ये (सीईआयआर) नोंदणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने १५ कोटींची तरतूद केली आहे. यातून मोबाईल चोरीला आळा घालता येणार आहे.