महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'सरकारने केलेल्या तीन मोठ्या चुकांमुळे अर्थव्यवस्था गोंधळात' - अर्थव्यवस्था

आर्थिक विकासदराबाबत  येत्या वर्षातही देश उदासीनतेकडे जात आहे. जर मध्यपूर्वेत आणि अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध होणार असेल तर सरकारकडे 'बी' प्लॅन नाही का? असा पी. चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केला.

P. Chidambaram
पी. चिदंबरम

By

Published : Feb 5, 2020, 7:29 PM IST

नवी दिल्ली - नोटाबंदीची भयानक चूक, सदोष जीएसटी आणि बँकांची दबलेली स्थिती या सरकारने तीन मोठ्या चुका केल्या आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था गोंधळात पडल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिली. ते श्रीराम वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

आर्थिक विकासदराबाबत येत्या वर्षातही देश उदासीनतेकडे जात आहे. जर मध्यपूर्वेत आणि अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध होणार असेल तर सरकारकडे 'बी' प्लॅन नाही का? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारने नॉमिनल विकासदर १० टक्क्यांचे उद्दिष्ट करताना स्वत: निराशाजनक असल्याचे दाखवून दिले. प्रत्यक्षात ५ टक्के विकासदर हा उत्तम असेल, असेही चिदंबरम यांनी सांगितले.

गेल्या सहा तिमाहीत विकासदर हा घसरला आहे. जर सातव्या तिमाहीतही विकासदर घसरला तर घसरण सुरुच असल्याचे दिसून येणार आहे. आपण अजूनही बोगद्यात आहोत. अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या स्थितीची कारणे विरोधी पक्ष देत आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. सर्व आकडेवारीमधून अर्थव्यवस्था शक्तीहीन होत असल्याचे सूचित होत आहे. खाण, उत्पादन क्षेत्र, वीजनिर्मिती,कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या महत्त्वाच्या क्षेत्रात घसरण होत आहे.

सर्वसामान्यांचा हातात पैसा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र, सरकारने मागणी वाढविण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात केली आहे. त्यापेक्षा जीएसटी दरात कपात करून दिलासा देण्याची गरज होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मोठी संधी गमाविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details