महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सध्याच्या स्थितीत बँकांपुढे आव्हाने निर्माण होण्याची शक्यता - शक्तिकांत दास

शक्तिकांत दास म्हणाले, बँकिंग क्षेत्रात सुधारणा झाली आहे. बँकिंग क्षेत्र स्थिर राहिले आहे. वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी बँकांनी सक्रिय राहावे, अशी त्यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली.

Shaktikant Das
शक्तिकांत दास

By

Published : Dec 12, 2019, 1:19 PM IST

मुंबई- सध्याच्या आर्थिक स्थितीने बँकापुढे आव्हाने निर्माण होण्याची शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. आव्हाने सोडविण्यासाठी बँकांनी सक्रिय राहावे, अशी अपेक्षा शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. ते देशातील प्रमुख सरकारी बँकांच्या प्रमुखांची आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठक घेतली.

शक्तिकांत दास म्हणाले, बँकिंग क्षेत्रात सुधारणा झाली आहे. बँकिंग क्षेत्र स्थिर राहिले आहे. वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी बँकांनी सक्रिय राहावे, अशी त्यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली. विशेषत: थकित मालमत्तेबाबत योग्य समन्वय साधून मार्ग काढण्यात यावा, असे दास यांनी म्हटले.

हेही वाचा-अ‌ॅमेझॉनची ओनिडाबरोबर भागीदारी; स्ट्रीमिंग सेवेकरता फायर टीव्हीची मिळणार सुविधा

आरबीआयने रेपो दर कमी केले आहेत. त्याचा फायदा बँकांनी ग्राहकापर्यंत पोहोचविण्यावरही दास यांनी बैठकीत चर्चा केली. मागील पतधोरणात आरबीआयने रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे. असे असले तरी आरबीआयने चालू वर्षात १.३५ टक्के रेपो दर कमी केला आहे. अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने उत्पादक क्षेत्रात पुरेसा कर्जपुरवठा, बिगर बँकिंग कर्जदार आणि लघू उद्योग या विषयावरही बैठकीत चर्चा झाली. याचबरोबर डिजीटल आर्थिक व्यवहाराच्या प्रक्रियेबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

हेही वाचा-जीएसटी परिषद : करसंकलन घटल्याने जीएसटीचे दर वाढण्याची शक्यता

अर्थव्यवस्था मंदावली असताना चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकासदर हा ४.५ टक्के राहिला आहे. आरबीआयने चालू वर्षाचा विकासदर हा ५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details