नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे जगभरात ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी भारतीय गुंतवणुकदारांचा सार्वजनिक रोखे आणि राईट्स इश्यू (रोखे) यांच्यामधील गुंतवणूक ही मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
सार्वजनिक रोखे, आयपीओमधून उभा झालेला निधी आणि विदेशी गुंतवणूदार संस्थांच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असतानाही म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा-छळवणूक करणाऱ्यांचे संरक्षण थांबवा; 500 गुगल कर्मचाऱ्यांचे सुंदर पिचाईंना पत्र
- मागील आर्थिक वर्षात कंपन्यांनी सार्वजनिक रोख्यांमधून 46,000 हजार कोटी रुपये उभे केले आहेत. त्यामध्ये आयपीओचाही समावेश आहे. तर दुसरीकडे कंपन्यांनी 64,000 कोटी रुपये राईट्स इश्यूमधून जमविले आहेत.
- सार्वजनिक रोख्यांचे प्रमाण हे 115 टक्क्यांनी तर राईट्स इश्यूचे प्रमाण हे 15 टक्क्यांनी वाढले आहे.
- आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपन्यांनी सार्वजनिक रोख्यांमधून 21,382 कोटी रुपये आणि राईट इश्यूमधून 55,670 कोटी रुपये जमविले होते.
हेही वाचा-जॅक मा यांना पुन्हा चीन सरकारचा दणका; अलिबाबाला ठोठावला 2.8 अब्ज डॉलरचा दंड
कॉर्पोरेट रोख्यांमध्येही तेजी-
कॉर्पोरेट रोख्यांमधील गुंतवणुकीत आणखीन वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपन्यांनी2,000 कॉर्पोरेट रोख्यांमधून 7.82 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमविला होता. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 13.5 टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षी कंपन्यांनी 1,821 कॉर्पोरेट रोख्यांमधून 6.90 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमविला होता.