महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाचा फटका; एप्रिलमध्ये निर्यातीत ६०.२८ टक्क्यांची घसरण

देशात होणाऱ्या आयातीत ५८.६५ टक्क्यांची घसरण झाली आहे. देशात एप्रिलमध्ये केवळ १७.१२ अब्ज डॉलर एवढ्या मूल्याच्या उत्पादनांची आयात झाली आहे. तर गतवर्षी एप्रिलमध्ये ४१.१ अब्ज डॉल एवढ्या मूल्याच्या उत्पादनांची आयात झाली होती.

By

Published : May 15, 2020, 8:41 PM IST

निर्यात क्षेत्र
निर्यात क्षेत्र

नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केली असल्याने देशाच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. देशाची निर्यात एप्रिलमध्ये ६०.२८ टक्क्यांनी घसरून केवळ १०.३६ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.

देशात होणाऱ्या आयातीत ५८.६५ टक्क्यांची घसरण झाली आहे. देशात एप्रिलमध्ये केवळ १७.१२ अब्ज डॉलर एवढ्या मूल्याच्या उत्पादनांची आयात झाली आहे. तर गतवर्षी एप्रिलमध्ये ४१.१ अब्ज डॉल एवढ्या मूल्याच्या उत्पादनांची आयात झाली होती.

हेही वाचा-कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा; शेतकऱ्यांना बाजारपेठ निवडण्याचे मिळणार स्वातंत्र्य

व्यापार तूट कमी होवून ६.७६ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे. गतवर्षी व्यापार तूट ही १५.३३ अब्ज डॉलरची होती. गतवर्षी मार्च २०२० मध्ये निर्यातीत ३४.५७ टक्के घसरण झाली होती. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने निर्यातीत घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या संकटाने त्यात आणखीन भर पडली आहे. विस्कळित झालेली पुरवठा साखळी आणि मागणी कमी झाल्याने ऑर्डर रद्द झाल्या आहेत. त्याचाही निर्यातीवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा-शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज; ऑपरेशन ग्रीन योजनेला मुदतवाढ

अशी विविध क्षेत्रात झाली घसरण

  • जेम्स आणि ज्वेलरी - ९८.७४ टक्के
  • कातडी उद्योग - ९३.२८ टक्के
  • पेट्रोलियम उत्पादने - ६६.२२ टक्के
  • अभियांत्रिकी उत्पादने - ६४.७६ टक्के
  • खनिज तेलाची आयात - ४.६६ टक्के

हेही वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details