नवी दिल्ली- कंपन्यांच्या घोटाळ्यांची संख्या वाढत असताना कॉर्पोरेट कायद्यापुढे गंभीर आव्हान निर्माण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले. संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर निर्माण करायला पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. ते 'कॉर्पोरेट लॉ सेवा अॅकडमी'च्या कार्यक्रमात बोलत होते.
सरकारने नागरिकांना व गुंतवणूकदारांना उत्तम सेवा देण्याचे निश्चित केले असल्याचे केंद्रीय कंपनी व्यवहार आणि वित्तीय राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले. उद्योगानुकलतेमध्ये देश पहिल्या २० क्रमांकामध्ये आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची ठाकूर यांनी माहिती दिली.
हेही वाचा-जेटचे संस्थापक नरेश गोयल अडचणीत; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी
कंपन्यांच्या घोटाळ्यांनी भांडवल निर्मितीवर परिणाम-
सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेमध्ये कंपन्यांचे घोटाळे वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कर्जबुडव्यांचाही समावेश आहे. त्याचा भांडवल निर्मितीवर परिणाम होत आहे. अनेक उद्योगांना देशामध्ये नियमांचे पालन करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी योग्य दिशेत प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.