रियाध- जागतिक अर्थव्यवस्था ही नाजूक स्थितीत आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्गजन्य रोगामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारणेमध्ये धोका निर्माण होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. त्या जी २० च्या वित्त मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत बोलत होत्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हा यांनी जी-२० च्या वित्त मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम सांगितला. त्या म्हणाल्या, चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर हा सुधारून ३.३ टक्क्यापर्यंत थांबला आहे. गेल्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा २.९ टक्के होता.
हेही वाचा-रुपया गडगडला... डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरण
अर्थव्यवस्थेमधील सुधारणेचा अंदाज...नाजूक आहे. कोरोना-१९ विषाणू ही जागतिक आरोग्य आपत्ती आहे. त्यामुळे चीनमधील आर्थिक चलनवलन विस्कळित झाले आहे. त्यामुळे सुधारणेला धोका निर्माण होवू शकतो.
हेही वाचा-ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा
कोरोनामुळे चीनमध्ये सुमारे २,४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक, व्यापार आणि गुंतवणूकदारांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. कोरोनाने जागतिक वृद्धीदर हा ०.१ टक्क्यांनी कमी होवू शकतो. तर चीनचा वृद्धीदर हा चालू वर्षात ५.६ टक्के होण्याची शक्यता आहे. विषाणुचा प्रभाव वाढत गेला तर चीनसह उर्वरित जगावर परिणाम होवू शकतो, असे 'जी २०' ला सांगितले आहे.