नवी दिल्ली - कोरोना विषाणुचा भारतावर मर्यादित परिणाम होईल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. मात्र, चीन ही मोठी अर्थव्यवस्था असल्याने जागतिक जीडीपी आणि व्यापारावर निश्चितच परिणाम होईल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
कोरोनाचा काही क्षेत्रांवर काही मर्यादित परिणाम होणार आहे. मात्र, समस्येवर मात करण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करणे आवश्यक असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. कोरोनाच्या समस्येवर प्रत्येक धोरणकर्ते आणि पतधोरण यंत्रणेचे जवळून लक्ष आहे. बहुतांश कंपन्या त्यांच्याकडे तीन ते चार महिन्यांचा साठा शिल्लक ठेवतात. त्यामुळे त्यांना व्यवस्थापन करणे शक्य झाले पाहिजे. जिथे औषधांसाठी लागणारा कच्चा माल आहे, त्या ठिकाणी कोरोनाचा परिणाम झाला नाही. त्यामुळे औषधांसाठी लागणारा कच्चा माल मिळू शकणार आहे.