नवी दिल्ली - देशाच्या आठ मुलभूत पायाभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा एप्रिलमध्ये ३८.१ टक्क्यांनी घसरला आहे. कोरोना महामारीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने ही घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
गतवर्षी ८ मुलभूत क्षेत्रांनी एप्रिलमध्ये ५.२ टक्के वृद्धीदर नोंदविला होता. चालू वर्षात मार्चमध्ये ८ मुलभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा ९ टक्क्यांनी घसरला होता. आठ मुलभूत क्षेत्रामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादन, खते, स्टील, सिमेंट आणि वीजर्निमितीचा समावेश आहे.
हेही वाचा-महामारीत नोकऱ्या गमविण्याचे प्रमाण किती? सरकार गोळा करणार आकडेवारी
- खनिज तेलाच्या उत्पादनात एप्रिलमध्ये ६.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मार्च महिन्यात खनिज तेलाच्या उत्पादनात ५.५ टक्क्यांची घसरण झाली होती.
- कोळशाचे उत्पादन हे उणे १५.५ टक्के झाले आहे. मार्चमध्ये कोळशाचे उत्पादन४.४ टक्के होते.
- उर्जा निर्मितीचे उत्पादन हे एप्रिलमध्ये २२.८ टक्क्यांनी घसरले आहे. तर मार्चमध्ये उर्जा निर्मितीचे उत्पादन हे ८.२ टक्क्यांनी घसरले होते.