नवी दिल्ली - उचित व्यापारासाठी नियमन करणाऱ्या भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ई-कॉमर्सच्या बाजारपेठेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासात व्यापार पद्धतीसह वेगाने विकसित होणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रातील अडथळ्यांचा विचार करण्यात येणार आहे.
भारतीय स्पर्धा आयोग करणार ई-कॉमर्स बाजारपेठेचा अभ्यास - eCommerce business practice
ई-कॉमर्स कंपन्यांकडून अनुचित व्यापाराचा अवलंब होत असल्याची तक्रार यापूर्वी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने सीसीआयकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीसीआयचा अभ्यास करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
ऑनलाईन व्यापाराचे महत्त्व वाढत असताना आणि ई-कॉमर्स क्षेत्राचा वेगाने विकास होताना सीसीआय त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे. या अभ्यासातून महत्त्वाची उत्पादने (मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आदी) तसेच सेवा (रोजगार आणि हॉस्पिटिलिटी, अन्न घरपोहोच सेवा) यांच्या ऑनलाईन व्यापाराबाबत माहिती घेतली जाणार आहे. अभ्यासातून प्राथमिक आलेली माहिती ऑगस्टमधील कार्यशाळेत सादर केली जाणार आहे. तर शेवटचा अभ्यास अहवाल हा चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीदरम्यान सादर केला जाणार आहे. मात्र, हा अभ्यास म्हणजे सीसीआयकडून ई-कॉमर्स क्षेत्राचा करण्यात आलेला तपास अथवा चौकशी नसल्याचे सीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.