महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पीएमसी बँकेच्या स्थितीवर जवळून देखरेख; फॉरेन्सिक लेखापरीक्षणही सुरू - आरबीआय - पंजाब महाराष्ट्र को ओपरेटिव्ह बँक

पीएमसीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आरबीआयने एजन्सीची नियुक्ती केली आहे. पीएमसीची महाराष्ट्रासह विविध राज्यात मालमत्ता आहे.

पीएमसी

By

Published : Nov 8, 2019, 12:17 PM IST

Updated : Nov 8, 2019, 12:32 PM IST

नवी दिल्ली- हजारो कोटींच्या घोटाळ्याचा फटका बसलेल्या पीएमसीच्या स्थितीचे भारतीय रिझर्व्ह बँक जवळून देखरेख करत आहेत. तसेच पंजाब महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेचे (पीएमसी) फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्यात येत असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. ते वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

पीएमसीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आरबीआयने एजन्सीची नियुक्ती केली आहे. पीएमसीची महाराष्ट्रासह विविध राज्यांत मालमत्ता आहे. शक्तिकांत दास म्हणाले, आम्ही विविध तपास संस्थांशी चर्चा करत आहोत. यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कायद्यात काही सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. त्याप्रमाणे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटिज अॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचेही दास यांनी सांगितले.

हेही वाचा-पीएमसीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयसह केंद्र सरकारकडून मागितले उत्तर

पीएमसी ही देशातील पहिल्या नागरी सहकारी बँकांपैकी एक बँक होती. मात्र, बँकेत ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा झाल्याने पीएमसीवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत.


हेही वाचा-पीएमसी खातेदारांना आरबीआयकडून किंचित दिलासा; पैसे काढण्याच्या मर्यादेत 'एवढी' केली वाढ

बँकेत ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा -

आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल ग्रुपचे राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांना पीएमसीमधील घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच बँकेचा माजी चेअरमन वारयम सिंग व बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक हेदेखील अटकेत आहेत. पीएमसीमध्ये सुमारे ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा झाला आहे.

Last Updated : Nov 8, 2019, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details