महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'विकासदर उणे राहणार असताना आरबीआयने चलन तरलतेचा निर्णय का घेतला? - Chidambaram over RBI decisions

तुमचे कर्तव्य करा. आर्थिक सुधारणा करा, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरकारला स्पष्ट सांगितले पाहिजे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले.

पी चिदंबरम
पी चिदंबरम

By

Published : May 23, 2020, 1:44 PM IST

नवी दिल्ली - चलनाची तरलता वाढविण्याच्या आरबीआयच्या निर्णयावरून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाचा विकासदर उणे होण्याच्या दिशेने जात आहे. असे असताना आरबीआय आणखी चलनाची तरलता का निर्माण करत आहे, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला.

आरबीआयने सलग दुसऱ्यांदा आपत्कालीन परिस्थितीत रेपो दरात कपात केली आहे. त्यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आरबीआय गव्हर्नर यांनी मागणी (Demand) कमी झाल्याचे म्हटले आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये विकासदर उणे होण्याच्या दिशेने जात आहे. तरीही ते चलनाची तरलता का वाढवित आहेत?

तुमचे कर्तव्य करा. आर्थिक सुधारणा करा, असे शक्तिकांत दास यांनी सरकारला स्पष्ट सांगितले पाहिजे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले. आरबीआयच्या माहितीनंतरही सरकार अथवा केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्या आर्थिक पॅकेजचे समर्थन करणार आहेत का? त्यांचे पॅकेज हे राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या (जीडीपी) १ टक्क्यांहून कमी आहे का?

हेही वाचा-कोरोनाशी 'भारतीय पोस्ट'चा लढा; २ हजार टन औषधांसह साधनांची डिलिव्हरी

चिदंबरम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. सरकारने अर्थव्यवस्थेला उणे विकासदरात कसे ओढले, याची आरएसएसला लाज वाटायला पाहिजे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-धक्कादायक! 2.9 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती 'डार्क वेब'वर लीक

ABOUT THE AUTHOR

...view details