कोलकाता - कोळसा खाण कामगार हे २४ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. हा संप रोखण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक ठरणार आहे. कारण खाण उद्योगातील १०० टक्के गुंतवणुकीच्या विरोधात कामगार संपावर जाणार आहेत.
कोळसा संयुक्त सचिवांच्या समन्वयाने बैठक पार पडल्याचे अखिल भारतीय कोळसा कामगार संघटनेचे महासचिव डीडी रामानंदन यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही सरकारबरोबरील बैठकीला उपस्थित राहणार आहोत. मात्र सरकार कोळसा खाणींचे खासगीकरण करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये संप मागे घेणार नाही.
हेही वाचा-एसबीआयच्या शाखेचे लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवरील गावात उद्घाटन Published on :15 minutes ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला भारतीय मजदूर संघ इतर संघटनासोबत संपात सहभागी होणार नाही. मात्र त्यांनी २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान ५ दिवस संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. बीएमएस नेते बी.के.राय यांनी सरकारसोबत चर्चा करणार नसल्याचे सांगितले. संपाबाबात गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर नितीन गडकरी म्हणतात, ही कठीण वेळही निघून जाईल !