नवी दिल्ली- केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे मर्यादित लाभ करून देणारे आहे. या पॅकेजमधून त्वरित १० टक्क्यांहून मदत होईल, असे मत माजी केंद्रीय वित्तीय सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांनी व्यक्त केले.
आर्थिक पॅकेजची तीन महत्त्वाचे उद्दिष्टे होती. पहिले आर्थिक विकास पुन्हा रुळावर आणणे, दुसरे उद्योगांना चालना देणे आणि तिसरे टाळेबंदीत अनेक जण बेरोजगार झाले आहेत, त्यांना दिलासा देणे. अनेक स्थलांतरित घरी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक मदत कमी असून चलनाची तरलतेची उपाययोजना अधिक आहे. पॅकेजमध्ये १० लाख कोटी रुपयांहून अधिक चलनाच्या तरलतेसाठी उपाययोजना आहे. त्याचा तिन्ही उद्दिष्टांना फारशी मदत होईल, असे वाटत नसल्याचे सुभाष चंद्रा गर्ग यांनी सांगितले.