नवी दिल्ली- केंद्र सरकारने जीएसटी (वस्तू व सेवा कर) मोबदल्यापोटी राज्यांना 30,000 कोटी रुपये 27 मार्चला वितरीत केले आहेत. तर चालू आर्थिक वर्षात अजून 63 हजार कोटी रुपये केंद्राकडे प्रलंबित आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे.
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने राज्यांना एकूण 70,000 कोटी रुपये वितरीत केले आहे. तर विशेष कर्जाच्या यंत्रणेतून केंद्र सरकारने राज्यांना 1.10 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे वितरित केले आहेत. कोरोना महामारीमुळे राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी उत्पन्नात घट झाल्याने केंद्राने राज्यांना विशेष कर्जाची यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. केंद्र सरकारने एकत्रित जीएसटीमधून (आयजीएसटी) राज्यांना 28,000 हजार कोटी वितरित केले आहे.