महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टोळधाडीचे आव्हान; कृषी मंत्रालय विदेशामधून मागविणार फवारणी यंत्र

भारत-पाकिस्तान सीमारेषेवरून नवे टोळधाड आल्याची माहिती नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यांच्या कृषी विभागांशी समन्वय ठेवून टोळधाड नियंत्रणाच्या उपाययोजना करणार असल्याचेही केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी सांगितले.

टोळधाड
टोळधाड

By

Published : May 29, 2020, 10:30 AM IST

नवी दिल्ली - पिकांचा नाश करणाऱ्या टोळधाडचा उत्तर भारतात प्रार्दुभाव वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी १५ स्प्रेयर्स (फवारणी यंत्र) इंग्लंडमधून खरेदी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. तसेच कीटकनाशक फवारण्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येणार आहे.

भारत-पाकिस्तान सीमारेषेवरून नवे टोळधाड आल्याची माहिती नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यांच्या कृषी विभागांशी समन्वय ठेवून टोळधाड नियंत्रणाच्या उपाययोजना करणार असल्याचेही केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी सांगितले. त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सीमा सुरक्षा दलाचीही मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा- स्टेट बँकेचा धक्का; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात

-या राज्यांमध्ये आढळून आले आहेत टोळधाड

राजस्थानमधील बारमेर, जोधपूर, नागपूर, बिकानेर, सुरतगढ, दौसा या जिल्ह्यात अपरिपक्व टोळधाड आढळून आले आहेत. तर उत्तर प्रदेशमधील झाशी, मध्यप्रदेशमधील रेवा, मोरेना, बेटूल, खंडवा जिल्ह्यातही अपरिपक्व टोळधाड आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात टोळधाड आढळून आले आहेत.

हेही वाचा-टाळेबंदीने उपासमार; व्यवसाय सुरू करण्याची फूल विक्रेत्यांची सरकारकडे मागणी

टोळधाडच्या प्रश्नाविषयी सरकार गंभीर असल्याचे केंद्रीय कृषीमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. या प्रश्नावर मात करण्यासाठी सरकार तातडीने उपाययोजना करत आहे. त्यासाठी राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारशी केंद्र संपर्कात आहेत. या राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-'आरबीआय रोखे रद्द करणे हा नागरिकांवर क्रूर प्रहार'

येत्या १५ दिवसात १५ स्प्रेयर्स इंग्लंडमधून भारतात येणार आहेत. तर आणखी ४५ स्प्रेयर्स हे एक ते दीड महिन्यात मागविण्यात येणार आहेत. स्प्रेयर्स हे हवेतून कीटकनाशकांची टोळधाडीवर फवारणी करतात. त्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण करणे शक्य होते.

ABOUT THE AUTHOR

...view details