नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून सुरू होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासोबतच, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाईल. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आठ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दुसरा टप्पा एक महिना लांबवला..
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून, अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा एक महिना लांबवण्यात आला आहे. यादरम्यान दररोज केवळ चार तास संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.