नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरिपाच्या सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केला. हा निर्णय चालू वर्षापासून लागू होणार आहे.
खरिपाच्या सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Narendra Modi
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एमएसपीच्या नव्या दराबाबत घोषणा केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एमएसपीच्या नव्या दराबाबत घोषणा केली.
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून खरिप पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढविण्यात आल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या (सीसीईए) अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.