महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'अॅमेझॉनसह फ्लिपकार्टच्या मोठ्या ऑफर बंद करा, अन्यथा न्यायालयात जावू' - प्रविण खंडेलवाल

अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप प्रविण खंडेलवाल यांनी केला.

'अॅमेझॉनसह फ्लिपकार्टच्या मोठ्या ऑफर बंद करा, अन्यथा न्यायालयात जावू'

By

Published : Sep 17, 2019, 8:34 PM IST

नवी दिल्ली - सणाच्या निमित्ताने अॅमेझॉन व फ्लिपकार्टने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलीतवर अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी आक्षेप घेतला आहे. सवलतीवर सरकारने बंदी घातली नाही, तर न्यायालयात जावू, असा त्यांनी इशाराही दिला आहे.

अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप प्रविण खंडेलवाल यांनी केला. ते पुढे म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांना बी२बी व्यवसाय करण्याची परवानगी आहे. तरीदेखील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात कर्जाचे व्याजदर आहेत. तरीही जागतिक कंपन्यांना सवलतीच्या दरात कर्ज दिले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.

हेही वाचा-काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या इच्छेपुढे सरकारने झुकू नये - सीएआयटी

ई-कॉमर्स कंपन्यांच्या अनुचित व्यापार पद्धतीविरोधात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी कारवाई करावी, अशी सीएआयटीने चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागणी केली होती. ई -कॉमर्स कंपन्या भविष्यातील व्यवसायाची रचना करत आहेत. मात्र त्यांच्या अनुचित व्यापारी पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात व्यसायाची हानी होत असल्याचा सीएआयटीने आरोप केला होता. त्यामधून क्षेत्रामध्ये असमानता आणि अयोग्य अशी स्पर्धा निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा-चीनी वस्तुंवर ५०० टक्के आयात शुल्क लागू करा; अखिल भारतीय व्यापारी संघटनेची मागणी

सरकारने अनुचित पद्धतीला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच योग्य स्पर्धा होण्यासाठी पावले उचलावी, अशी संघटनेने यापूर्वी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details