नवी दिल्ली -वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे डिसेंबरमध्ये १ लाख ३ कोटी १८४ कोटी रुपये झाले आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकिटांचे दर आजपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बातम्यांचा संक्षिप्त रुपात घेतलेला वेध.
डिसेंबरमध्ये जीएसटीचे १,०३,१८४ कोटींचे संकलन
नवी दिल्ली- वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे डिसेंबरमध्ये १ लाख ३ कोटी १८४ कोटी रुपये झाले आहे. तर केंद्रीय जीएसटीचे प्रमाण हे १९ हजार ९६२ कोटी रुपये आहे. तर राज्य जीएसटीचे प्रमाण हे २६ हजार ७९२ कोटी रुपये आहे. आयजीएसटीचे प्रमाण ४८ हजार ९९ कोटी रुपये आहे. यामध्ये २१ हजार २९५ कोटी रुपयांच्या आयात शुल्काचाही समावेश आहे. तर उपकराचे प्रमाण हे ८ हजार ३३१ कोटी रुपये आहे. यामध्ये ८४७ कोटी रुपयांच्या आयात शुल्काचा समावेश आहे.
हेही वाचा-अल्पबचत योजना : जानेवारी-मार्च तिमाहीत व्याज दर 'जैसे थे'