नवी दिल्ली- दुसऱ्यांदा सत्तेत आलेले मोदी सरकार दुसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार आहे. ईटीव्ही भारतने इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रीकल्चरचे (आयसीएफ) चेअरमन डॉ. एम. जे. खान यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कृषी क्षेत्राच्या अर्थसंकल्पाविषयीच्या अपेक्षावर चर्चा केली. तसेच कृषी क्षेत्राची प्रगती कशी होईल, यावर मत व्यक्त केले.
डॉ. एम. जे. खान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मालाची निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर काम करण्याची गरज आहे. येत्या अर्थसंकल्पात त्यावर तरतूद करण्यात येईल, अशी आशा आहे. भारतामधील कृषी क्षेत्राची प्रगती ही थेट देशाच्या आर्थिक प्रगतीशी निगडीत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता कृषी क्षेत्रासाठी नव्या योजना आणण्याची गरज आहे. तर आगामी अर्थसंकल्पात काही योजनामध्ये बदल करण्याची गरज आहे. याशिवाय पायाभूत विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.