नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी सुरुवातीला शेतीशी संबंधित विषयावर सरकार योजना सांगितल्या. यामध्ये त्यांनी २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार असल्याचे सांगितले. आमचे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री - Budget 2020 Latest Updates
अर्थसंकल्पामध्ये शेतीशी संदर्भात १६ विशेष योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या.
nirmala sitaraman
कृषी संदर्भात काय म्हणाल्या निर्मला सीतारामन -
- जैविक शेतीसाठी नवीन पोर्टल असेल.. ऑनलाईन मार्केटला गती दिली जाईल.
- १५ लाख कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यांना देण्याचे लक्ष्य.. दूध प्रक्रिया १०८ मिलीयन टन करण्याचे उद्दीष्ट
- पीएम कुसुम योजनेअंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार
- कृषी सिंचनासाठी १.२ लाख कोटी खर्च केला जाईल
- पाण्याची गंभीर समस्या असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांमध्ये विशेष योजना जाहीर केली जाणार
- दूध, मासे, मटणासाठी शीतगृह असलेल्या विशेष रेल्वेची योजना
- समुद्री भागातील शेतकऱ्याचे मत्स्य उत्पादन लक्ष्य २०८ मिलीयन टन इतके ठेवण्यात आले आहे.. ३०७७ सागर मित्र निवडले जातील...त्यातून किनारपट्टीच्या भागांमध्ये तरुणांना रोजगार मिळेल..
Last Updated : Feb 1, 2020, 12:39 PM IST