नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येत आहे. ९९ हजार ३०० कोटींची अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदीची अपेक्षा होती. लवकरच शिक्षण धोरण बदलले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्प : 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद - Budget 2020 Highlights
अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे...
शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद
हेही वाचा -देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री
शिक्षण क्षेत्राविषयी काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन -
- २०२१ पर्यंत १५० उच्च शिक्षण संस्था सुरू केल्या जातील, त्यांना स्किल्ड प्रशिक्षण दिले जाईल.
- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पदवी स्तरावर ऑनलाईन शिक्षण योजना सुरू केली जाईल.
- राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ सुरू केले जाणार...
- उच्च शिक्षणासाठी ३८ हजार ३१७ कोटी रुपये तर माध्यमिक शिक्षणासाठी ५६ हजार ५३६ कोटी रुपये खर्च केले जातील..
- नॅशनल फोरेन्सिक सायन्स विद्यापीठाची सुरुवात करणार
- गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुरुवात
- कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटी