महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला तर आर्थिक सर्व्हे ३१ जानेवारीला सादर होण्याची शक्यता - Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi

१ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प हा २०१५-१६ नंतर पहिल्यांदाच शनिवारी सादर होणार आहे. अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्याची परंपरा सरकार सुरू ठेवणार आहे का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना विचारला. त्यावर त्यांनी परंपरा सुरूच राहणार असल्याचे म्हटले.

Union Budget
केंद्रीय अर्थसंकल्प

By

Published : Dec 13, 2019, 7:40 PM IST

Updated : Dec 13, 2019, 7:53 PM IST

नवी दिल्ली - 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१' हा १ फेब्रुवारीला संसदेमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. तर आर्थिक सर्व्हे ३१ जानेवारीला मांडला जाऊ शकतो, असे वित्त मंत्रालयातील सूत्राने सांगितले.

'आर्थिक सर्व्हे २०१९' हा ४ जुलैला सादर करण्यात आला होता. तर केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला मांडण्यात आला होता. त्यानंतर मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०३० ला ५ लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. हे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी भारताने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ७ ते ८ टक्के निधी पायाभूत क्षेत्रावर दर वर्षी करणे गरजेचे असल्याचे उद्दिष्टात म्हटले आहे.

हेही वाचा-बीपीसीएलचे खासगीकरण: 'या' देशांत सरकार करणार रोड शो

१ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प हा २०१५-१६ नंतर पहिल्यांदाच शनिवारी सादर होणार आहे. अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्याची परंपरा सरकार सुरू ठेवणार आहे का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना माध्यमांनी विचारला. त्यावर त्यांनी परंपरा सुरुच राहणार असल्याचे म्हटले.

हेही वाचा-महागाई-मंदीवर प्रश्न विचारताच निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'नो कॉमेंट'

केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ पासून १ फेब्रुवारीला सादर करण्यात येत आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यामागे ३१ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करणे, हा उद्देश आहे. त्यामुळे केंद्र सरकारला नव्या आर्थिक वर्षात १ एप्रिलपासूनच १२ महिन्यांचा खर्च करणे शक्य होते.

Last Updated : Dec 13, 2019, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details