नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. तसेच निर्यात वाढविण्यासाठी निर्विक योजनेची घोषणाही केली.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२० - निर्विक योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र
खासगी क्षेत्राकडून डाटा सेंटर पार्कची बांधणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
उद्योगांसाठी योजना
खासगी क्षेत्राकडून डाटा सेंटर पार्कची बांधणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
जाणून घ्या, वित्तीय क्षेत्राला काय मिळणार आहे?
- प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र तयार करण्याची योजना असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
- निर्विक योजनेतून इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
- १ लाख ग्रामपंचायतींसाठी ऑप्टिकल फायबरची सुविधा देण्यात येणार आहे.
- भारत नेट योजनेसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद
- राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मोहिमेसाठी १ हजार ४८० कोटी रुपयांची तरतूद
- गुंतवणुकीच्या परवानग्यांसाठी खास कक्षाची स्थापना
- सार्वजनिक खासगी भागीदारीतून ५ नव्या स्मार्ट सिटीचे काम