जाणून घेऊ, आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पात काय मिळाले?
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील ११२ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात आयुष्यान रुग्णालये प्राधान्ये सुरू करण्यात येणार आहेत.
आरोग्य
नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील ११२ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात आयुष्यान रुग्णालये प्राधान्ये सुरू करण्यात येणार आहेत.
- महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना कर सवलत देण्यात येणार आहे.
- टीबी हरेगा देश जीतेगा अशी मोहीम राबवून क्षयरोगाचे २०२५ पर्यंत उच्चाटन करण्यात येणार आहे.
- श्रेणी २ शहरांमध्ये आणखी रुग्णालयांची गरज आहे.
- आयुष्यमान भारत योजनेत २०,००० रुग्णालयांचा समावेश आहे.
- इंद्रधनुष्य योजनेत आणखी नव्या रोगांचा समावेश करण्यात येणार आहे.
- स्वच्छ पाणी जल जीवन मिशन आणि स्वच्छता मिशन ही गरीबांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणखी विस्तारित करण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 1, 2020, 12:42 PM IST