महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

UNION BUDGET 2019 : मध्यमवर्गीयांना खूशखबर.! 5 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त - session

आयकराची मर्यादा अडीच लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. तसेच ५ लाख ते ८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर आकारला जाईल, असा अंदाज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

5 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त

By

Published : Jul 5, 2019, 10:35 AM IST

Updated : Jul 5, 2019, 5:14 PM IST

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.

मध्यमवर्गीयांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी गृह कर्जावर मोठी सवलत दिली आहे. घर खरेदी केल्यांतर मिळणाऱ्या दीड लाखांपर्यंत सवलत मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटी 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री घोषणा करताना

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना 2.5 लाखांपर्यंत सवलत दिली मिळणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात इलेक्ट्रिक वाहनावर भर देण्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच नीती आयोगाने भविष्यात केवळ ईलेक्ट्रिक वाहनांचाच वापर करण्यासाठी नियोजन केले आहे.

Last Updated : Jul 5, 2019, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details