महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आमच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याने भारताचेच नुकसान - चिनी मीडिया - चिनी वस्तू न्यूज

पूर्व लडाखमध्ये चीन सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. चिनी उत्पादनांवरील संतापातून काही नागरिकांनी टीव्ही रस्त्यावर फोडल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अशा स्थितीत चीनच्या इंग्रजी मीडियाने सरकारची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jun 22, 2020, 1:36 PM IST

नवी दिल्ली – चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची देशभरातून मागणी होत असताना चीनच्या माध्यमांनी त्यावर लेख लिहून प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लोकांनी शांत राहावे. ते चीनच्या उत्पादनांशिवाय जगू शकणार नाहीत, असे चीनच्या मीडियाने म्हटले आहे. चीन उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याने भारताचेच नुकसान होईल, असा दावा या माध्यमाने केला आहे.

पूर्व लडाखमध्ये चीन सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. चिनी उत्पादनांवरील संतापातून काही नागरिकांनी टीव्ही रस्त्यावर फोडल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अशा स्थितीत चीनच्या एका इंग्रजी मीडियाने सरकारची भूमिका अप्रत्यक्षणे स्पष्ट केली आहे. हे प्रसार माध्यम चीन सरकारची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जाते. यातील लेखात म्हटले आहे, की आशियामधील सर्वात मोठे उत्पादन प्रकल्प चीनमध्ये आहेत.

आशियात वेगाने विकसित होणाऱ्या दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आणि समानता असेल तच द्विपक्षीय व्यापारी संबंध सलोख्याचे राहणार आहेत. त्याचा आर्थिक फायदा दोन्ही देशांमधील लोकांना होऊ शकतो. भारताने सीमारेषेवरील संघर्षाचा विषय चीनबरोबरील व्यापार संबंधांत आणू नये, असे यात म्हटले आहे.

सीमारेषेच्या विषयावरून अधिक स्थिती वाईट होण्यापासून व द्विपक्षीय संबंध बिघडण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करण्याची गरजही चीनच्या माध्यमाने व्यक्त केली आहे. लडाखमधील सैनिक आमने-सामने आल्याची घटना हा दुर्दैवी होता, असे या चिनी माध्यमाने म्हटले आहे. त्याचा वापर राजकीय आणि कटाचा सिद्धांत मांडण्यासाठी करू नये, अशी भूमिका चिनी माध्यमानेघेतली आहे.

काही कट्टर लोकांकडून भडकविले जात आहे. पण भारतीय लोक त्याला फसणार नाहीत, अशी आशा असल्याचे चीनच्या मीडिने म्हटले आहे. चीनने भारताला विकासाच्या खूप संधी दिल्याचे लेखात म्हटले आहे. भारतामधील 30 युनिकॉर्न स्टार्टअपपैकी 18 स्टार्टअपमध्य चीनने पैसे गुंतविले आहेत. अनेक भारतीय त्यांच्या घरात टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, एसी, फॅशनेबल मोबाईल आणि लॅपटॉप वापरतात. हे सर्व चीनमधील उत्पादने आहेत. ते कमी किमतीत आणि चांगल्या दर्जाचे आहे. चीनच्या उत्पादनांच्या जागी दुसऱ्या उत्पादनांनी जागा घेणे कठीण असल्याचा दावा चिनी माध्यमाने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details