महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशाचा पहिला कॉर्पोरेट बाँड १२ डिसेंबरला होणार लाँच - पहिला कॉर्पोरेट बाँड

भारत बाँडच्या ईटीएफ खुला करण्याला शेअर बाजार नियामक असलेल्या सेबीकडून मान्यता मिळाली आहे. गुंतवणूकदारांना २० डिसेंबरपर्यंत रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

भारत बाँड ईटीएफ
भारत बाँड ईटीएफ

By

Published : Dec 10, 2019, 7:45 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकार पहिला कॉर्पोरेट ईटीएफ भारत बाँड (रोखे) १२ डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. यामधून विविध सार्वजनिक कंपन्यांना निधी मिळू शकणार आहे.

भारत बाँडच्या ईटीएफ खुला करण्याला शेअर बाजार नियामक असलेल्या सेबीकडून मान्यता मिळाली आहे. गुंतवणूकदारांना २० डिसेंबरपर्यंत रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या रोख्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन ईडेलवायजेस करणार आहे. हे रोखे ७ हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. ईटीएफमधून एनएचएआय, हुडको, आयआरएफसी, एनटीपीसी, पीजीसीआयएल, गेल, पीएफसी, एक्झिम बँक आणि नाबार्डला कर्ज मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ईटीएफ खुला करण्याला ४ डिसेंबरला मंजुरी दिली. तसेच किरकोळ गुंतवणुकदारांना ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची मंजुरी दिली. ईटीएफला निश्चित कालमर्यादा असणार आहे. तर ईटीएफ शेअर बाजारातही सूचिबद्ध होणार आहे.

हेही वाचा-पेटीएम पेमेंटस बँकेकडून नोव्हेंबरमध्ये ६ लाख फास्टॅग वितरीत

यापूर्वी केंद्र सरकारने २०१४ ला पहिल्यांदा इक्विटी ईटीएफ लाँच केला होता. त्या सरकारी रोख्यांना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर भारत-२२ ईटीएफलाही गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा-कांद्यावरील संकट कशामुळे?


छोट्या गुंतवणूकदारांनाही ईटीएफ घेता येणार -
भारत बाँड ईटीएफ शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही छोटा गुंतवणूकदार ईटीएफची खरेदी अथवा विक्री करू शकणार आहे. या रोख्यांची किंमत १० हजारांहून कमी असणार आहे. ईटीएफ हे छोटे गुंतवणूकदारही खरेदी करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details