नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. बहुप्रतिक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत.
गरोदर आणि लहान बालके असलेल्या महिला भारत सरकारच्या प्राधान्यक्रमावर असतील, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेचे कौतुक केले. संबंधित योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या. तसेच 35 हजार 600 कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावला असून बालविवाहाचे प्रमाण देखील घटल्याची माहिती त्यांनी दिली.