मुंबई – देशातील सर्व बँकांकडील सकल बुडित कर्जाचे (जीएनपीए) प्रमाण हे वाढणार असल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. मार्च 2020 पर्यंत सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे 8.5 टक्के होते. चालू आर्थिक वर्षाखेर सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे 12.5 टक्के होईल, असा अंदाज आरबीआयच्या वित्तीय स्थिरता अहवालात (एफएसआर) व्यक्त केला आहे.
अत्यंत प्रतिकूल स्थितीत बँकांकडील सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे मार्च 2021 पर्यंत 14.7 टक्के होईल, असा अंदाज आरबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.