महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बँक कर्जाचा वृद्धीदर प्रथमच घसरून एक अंकी; आरबीआयच्या आकडेवारीत ८.८ टक्क्यांची नोंद - consumption demand

बँकांमध्ये जमा असलेल्या रकमेतही घट झाली आहे. २७ सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत बँकांमधील रकमेत ९.३८ टक्के घसरण होऊन रक्कम १२९.०६ लाख कोटी रुपयावर पोहोचली आहे.

संग्रहित - आरबीआय

By

Published : Oct 12, 2019, 7:59 PM IST

मुंबई - चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदाच भारतीय बँकांच्या कर्जाच्या वृद्धीदरात घसरण झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार २७ सप्टेंबरपर्यंतच्या पंधरवड्यात बँकांच्या कर्जाचा वृद्धीदर हा ८.८ टक्के राहिला आहे. या काळात बँकांनी ९७.७१ लाख कोटींचे कर्ज वाटप केले. गतवर्षी याच कालावधीत कर्जाचा वृद्धीदर हा ९.४ टक्के होता.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार चालू वर्षात १४ सप्टेंबरपर्यंतच्या पंधरवड्यात बँकांच्या कर्जाचा वृद्धीदर हा १०.२६ टक्क्यांनी वाढला होता. या कालावधीत ९७.०१ लाख कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले होते. बँकांमध्ये जमा असलेल्या रकमेतही घसरण झाली आहे. २७ सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत बँकांमधील रकमेत ९.३८ टक्के घट होवून रक्कम १२९.०६ लाख कोटी रुपयावर पोहोचली आहे.

सेवा क्षेत्रातील कर्जाचा वृद्धीदर हा २६.७ टक्क्यांवरून १३.३ टक्के झाला. तर वैयक्तिक कर्जाचा वृद्धीदर हा ऑगस्टमध्ये १५.६ टक्के राहिला. गतवर्षी वैयक्तिक कर्जाचा वृद्धीदर हा १८.२ टक्के होता. कर्जाचा वृद्धीदर प्रथमच एक आकडी झाल्याने आर्थिक संकट असल्याचे सूचित झाले आहे. मागणी कमी झाल्याने कर्जाचा वृद्धीदर कमी झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details