नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. तर एटीएममध्ये पुरेसे पैसे असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत सर्व बँकांच्या शाखा सुरू असल्याचे सांगितले. बँकांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व खासगी आणि सरकारी बँकांच्या प्रमुखांशी शनिवारी चर्चा केली आहे. बँकांचे कामकाज सुरळित राहण्याकरता आणि चलनाचा पुरेसा राहण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. सर्व बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.
हेही वाचा-संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली