मुंबई- टाळेबंदीत नागरिकांना बँकिंग सेवेची अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने बँकिंग सेवा ही सार्वजनिक उपयोगी सेवा म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना 21 एप्रिलपासून पुढे सहा महिन्यापर्यंत संप करता येणार नाही.
औद्योगिक वाद कायद्यांतर्गत केंद्र सरकारने बँकिंग सेवा ही सार्वजनिक उपयोगी सेवा असल्याचे 20 एप्रिलला अध्यादेश काढले आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार बँकांतील कर्मचारी व अधिकारी 21 एप्रिलपासून पुढे सहा महिने संप करू शकणार नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्याने केंद्रीय कामगार मंत्रालयाने बँकिंग सेवांबाबतची अधिसूचना 17 एप्रिलला काढली आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या संकटात दारू विक्री सुरू करण्यावर मद्यनिर्मिती उद्योगाची 'ही' आहे भूमिका