चेन्नई - बँक कर्मचारी संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी आजपासून संप पुकारला आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, चेन्नई आणि दिल्ली इतर शहरांमधील एकूण ३१ लाख धनादेश वटलेले नाहीत. ही रक्कम एकूण २३ हजार कोटी रुपयांची असल्याचे इंडियन बँक एम्पलॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले.
बँक कर्मचारी संघटनाच्या संपामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचारी संघटनेच्या शिखर संघटनेने भाग घेतला आहे. बँकेच्या विविध ९ संघटनांनी संपात भाग घेतला आहे. बँक कर्मचारी संघटनांचा संप आजपासून १ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. संपाचा देशातील विविध शहरामध्ये प्रमाणे दिसून आला आहे. यामध्ये तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, गुजरात, कर्नाटक, केरळ, बिहार या राज्यांचा समावेश आहे.