चेन्नई -केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना एआयबीईए आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या बँक कर्मचाऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी संघटनेच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या विलिनीकरणाला विरोध करत खासगी तसेच सरकारी बँकांमधील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. एआयबीईएचे महासचिव सी.एच.वेंकटचलम म्हणाले, चुकीच्या वेळी बँकांचे विलिनीकरण करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. बँकांचे विलिनीकरण म्हणजे सहा बँका बंद पडण्यासारखे असल्याचा त्यांनी दावा केला. पुढे ते म्हणाले, सरकार बँकांचे विलिनीकरण म्हणू शकते. मात्र अनेक वर्षामध्ये बांधणी व्हायला वेळ लागलेल्या ६ बँका या बँकिंग क्षेत्रामधून अदृश्य होणार आहेत.
हेही वाचा-पंजाब नॅशनल बँकेसह दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण ; निर्मला सीतारामन यांची घोषणा