महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा; ५ लाखापर्यंतच्या रकमेवर विमा संरक्षण - केंद्रीय अर्थसंकल्प २०२०

बँकांमधील ठेवीवरील विमा संरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी ग्राहकांची मागणी होती. या मागणीची केंद्रीय अर्थसंकल्पात दखल घेण्यात आली आहे.

बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा
बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा

By

Published : Feb 1, 2020, 1:05 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांना दिलासा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेत ठेवण्यात येणाऱ्या ५ लाखापर्यंतच्या रकमेवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वी १ लाख रुपयापर्यंतच विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

बँकांमधील ठेवीवरील विमा संरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी ग्राहकांची मागणी होती. या मागणीची केंद्रीय अर्थसंकल्पात दखल घेण्यात आली आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांसाठी साडेतीन लाख कोटींचा निधी देण्याचेही जाहीर केले.
  • सरकारी बँकांमधील भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार आहे.
  • बँकेतील अराजपत्रित जागांच्या भरतीसाठी स्वतंत्र एजन्सीची स्थापना करण्यात येणार आहे.

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत घोटाळा झाल्यानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details