महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वाहन उद्योगातील मंदीचा जीएसटी संकलनावर परिणाम - Auto recession in India

जीएसटी संकलनातून पैसा आलेला आहे. मात्र अकाउंटिगची समस्या आहे. त्यामुळे हा निधी राज्यांना देण्यात अडचणीच्या येत असल्याचे सुशील मोदी यांनी सांगितले.

GST collection shortfalls
प्रतिकात्मक - जीएसटी संकलन

By

Published : Dec 7, 2019, 4:10 PM IST

कोलकाता - वाहन उद्योगातील मंदीचा जीएसटीच्या संकलनावर परिणाम झाल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले आहे. ते 'कॉन्कलेव्ह इस्ट'च्या कार्यक्रमात बोलत होते.

सुशील मोदी म्हणाले, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जीएसटी महसूलावर परिणाम झाला आहे. विशेषत: वाहन उद्योगातील मंदीचा जीएसटीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कराच्या साम्राज्यात संकलन घटले आहे. सुशील मोदी हे जीएसटीच्या मंत्रिस्तरीय गटाचेही प्रमुख आहेत.

जीएसटी संकलनात वाहन उद्योगाचा प्रमुख वाटा राहिलेला आहे. या क्षेत्रामधून पुरेसा पैसा आलेला नाही, असेही मोदी म्हणाले. जीएसटी संकलनातून पैसा आलेला आहे. मात्र अकाउंटिगची समस्या आहे. त्यामुळे हा निधी राज्यांना देण्यात अडचणीच्या येत असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा -कॉर्पोरेट कर १५ टक्क्यापर्यंत कमी करावा- सीआयआयची मागणी

जीएसटी करक्षेत्राच्या आकारावर पुढील जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. ही बैठक १८ डिसेंबरला होणार आहे. जीएसटीचे करसंकलन कमी होत असताना जीएसटी परिषद काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राज्यांचा जीएसटी मोबदला रखडला!

वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीचे मागील तीन महिन्यातील महसूली उत्पन्न रोडावले होते. मात्र, चालू आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यात जीएसटीने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. हे चालू वर्षातील सर्वाधिक जीएसटी महसुलीचे प्रमाण आहे. दिल्ली, पंजाब, पाँडेचरी आणि मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नुकतेच भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील जीएसटीचा प्रलंबित मोबदला राज्यांना द्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -जैविक इंधनांचा वापर होवू शकणारी वाहने कंपन्यांनी विकसित करावीत -नितीन गडकरी

ABOUT THE AUTHOR

...view details