नवी दिल्ली - कोरोना महामारीचा आशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. आशियाचा वर्ष २०२० मध्ये शून्य टक्के विकासदर राहणार आहे. ही गेल्या ६० वर्षातील आशियाची सर्वात खराब कामगिरी राहणार आहे.
आएमएफने 'कोविड-१९ महामारी आणि आशिया-प्रशांत प्रदेश: १९६० नंतर सर्वात कमी विकासदर' असा ब्लॉग लिहिला आहे. कोरोनाचा आशियावर खूप मोठा आणि अभूतपूर्व परिणाम होणार असल्याचे आयएमएफने ब्लॉगमध्ये म्हटले आहे. जगातील केवळ दोन देश वृद्धीदर नोंदविणार आहेत. त्यामध्ये भारताचाही समावेश असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. तर दुसरा देश म्हणजे चीनचाही विकासदर वाढणार आहे.