नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जीडीपीवरून केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या नेत्याने प्रत्यक्ष आकडेवारीकडे दुर्लक्ष करता चुकीचा तर्कवाद केल्याची टीका अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी दिली आहे. सतत सुधारणा सुरू असल्याने देशाची अर्थव्यवस्था सावरणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत 24.4 घसरण झाली होती. तर आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत विकासदरात 1.6 टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा-आर्थिक दुर्बल घटकांच्या लसीकरणाकरिता मलबार गोल्डकडून ८ कोटींची मदत
भारताचा जीडीपी 12.5 टक्क्यांनी वधारेल असा अंदाज
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की पी. चिदंबरम यांनी पूर्णत: अंधकारमय भविष्याचे चित्र रेखाटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा विकासर हा आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 12.5 टक्क्यांनी वधारेल असा अंदाज वर्तविला आहे. जेव्हा तुम्हा भारतीय आंत्रेप्रेन्युअर, लघू उद्योग, व्यापारी आणि एमएसएमई यांच्या बळकटीबाबत शंका घेता, तेव्हा ते स्वत:ला चालना देतात. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी 12.5 टक्क्यांनी वधारेल असा अंदाज वर्तविला आहे. एकमेव भारत हा दोन अंकी विकासदर नोंदविणार असल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्हटल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; जाणून घ्या, तज्ज्ञांचा अंदाज
अनेक देशांच्या जीडीपीत घसरण
एकट्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी हा घसरला आहे का? दुसऱ्या प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी घसरला नाही का? फ्रान्सच्या जीडीपीत 8.2 टक्के , जर्मनीच्या जीडीपीत 4.9 टक्के, इटलीच्या जीडीपीत 8.9 टक्के, युकेच्या जीडीपीत 9.9 टक्के घसरण झाली आहे. कॅनडा, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिकेच्या जीडीपीतही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले होते. जागतिकीकरण झालेल्या जगातही देशाची स्थिती बळकट झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री यांनी म्हटले आहे.
टाळेबंदीने अनेकांचे प्राण वाचल्याने आणि टाळेबंदी शिथील केल्याने सुधारणांचे हळूहळू सुधारित कोंब दिसून आल्याचा दावाही अनुराग ठाकूर यांनी केला.
पी. चिदंबरम यांनी काय केली होती टीका ?
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जीएसटीवरून टीकास्त्र सोडले. केंद्राने कर व्यवस्थेला वाईट कायद्यात रुपांतरित केल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी केली आहे. अधिकाऱ्यांचा समावेश असलेली जीएसटी अंमलबजावणी समिती म्हणजे थरथरणाऱ्या कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री ही मंत्रिस्तरीय समितीला एनडीए आणि पाठिंबा देणाऱ्या समितीचा विस्तार असल्यासारखे वागवित आहेत. जे अर्थमंत्री विरोधी मत व्यक्त करतात, त्यांना शाळेतील चुकीच्या विद्यार्थ्याप्रमाणे वागणूक देण्यात येते. जीएसटीमागील कल्पना ही आता शांतीत विसावली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने कोरोनाच्या लढ्यात परिणामकारक ठरणारी लस, औषधे आणि इतर उपकरणांना जीएसटीमधून वगळण्याची सातत्याने मागणी केली आहे. याबाबत जीएसटी परिषेदतही काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनी जीएसटीचे प्रमाण ५ टक्क्यांऐवजी ०.१ टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.