दावोस - माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यपद्धतीवर मत व्यक्त केले. डब्ल्यूटीओने आंतरराष्ट्रीय व्यापाराची भरभराट होण्यासाठी सर्व कामे ही मुक्त आणि अधिक कार्यक्षमपणे करण्याची परवानगी द्यावी, असे प्रभू म्हणाले. ते 'ग्रेट इंडो पॅसिफिक रेस'मध्ये बोलत होते.
इंडो-पॅसिफिक देशांना मुक्त व्यापार आणि व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी. या प्रदेशात प्रगती करण्याची प्रचंड क्षमता आहे. तसे सहकार्य आणि भागीदारी, दळणवळणातही या प्रदेशात सुधारणा झाल्याचेही सुरेश प्रभू म्हणाले.