महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अफगाणिस्तान स्थितीचा भारताच्या व्यापारावर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती - leading exporter S K Saraf

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता आल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम होणार आहे. त्याची माहिती भारतामधील विविध निर्यातदारांनी दिली आहे.

अफगाणिस्तान भारत व्यापार संबंध
अफगाणिस्तान भारत व्यापार संबंध

By

Published : Aug 19, 2021, 4:29 PM IST

Updated : Aug 27, 2021, 3:29 PM IST

नवी दिल्ली- तालिबानींच्या हातात अफगाणिस्तानची सत्ता आल्याने भारत आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार संबंधावर परिणाम होणार आहे. अनिश्चिततेच्या काळात हा लक्षणीय परिणाम असेल, असे भारतीय निर्यातदारांचे म्हणणे आहे.

फेडरेशन ऑफ इंडिया एक्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे (FIEO) महासंचालक अजय सहाय म्हणाले, की अफगाणिस्तानमधील बदललेली राजकीय स्थिती पाहता भारतीय निर्यातदारांनी विशेष दक्षता घ्यायला हवी. विशेषत: आर्थिक व्यवहाराबाबतीत काळजी घ्यायला हवी. अफगाणिस्तानमधील अनिश्चितता वाढत असताना व्यापारावर परिणाम होणार आहे.

अफगाणिस्तानमधील स्थितीचा भारताच्या व्यापारावर होणार परिणाम

हेही वाचा-विषेष मुलाखत- अविनाश धर्माधिकारी, आता भारतातही दिसेल तालिबानी दहशतवाद

अर्थतज्ज्ञांचे काय आहे मत?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक विश्वजीत धर म्हणाले, की भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीमुळे देशात बाजारपेठ विकसित होत आहे. मात्र, सध्याच्या स्थितीने या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी सालेह यांच्या उमेदवारीला अमेरिकेचा पाठिंबा

निर्यातदारांचे काय आहे मत?

  • प्लास्टिक्स एक्सपोर्ट्स प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे (PLEXCONCIL) चेअरमन अरविंद गोयंका म्हणाले, की नवीन खासगी कंपन्यांना तिसऱ्या देशाच्यामार्फत अफगाणिस्तानला निर्यात करावी लागणार आहे.
  • साई इंटरनॅशनलचे प्रोपायटर आणि निर्यातदार राजीव मलहोत्रा म्हणाले, की वेळेवर पैसे मिळण्याचा प्रश्न असल्याने भारतामधून पूर्णपणे निर्यात थांबणार आहे. आम्ही अफगाणिस्तानमधी परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पुढे काय करायचे ते ठरवू, असे मलहोत्रा यांनी सांगितले.
  • एफआयईओचे माजी अध्यक्ष आणि देशातील आघाडीचे निर्यातदार एस. के. सराफ म्हणाले, की द्विपक्षीय व्यापार संबंधावर मोठा परिणाम होणार आहे. आपण कदाचित सर्व गमाविणार नाही. कारण, त्यांना आपल्या उत्पादनांची गरज आहे.
  • अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता एफआयईओचे उपाध्यक्ष खलीद खान यांनीही व्यक्त केली. अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. निर्यातीसाठी हवाई मार्ग हे प्रमुख माध्यम आहे. या मार्गाची सेवा विस्कळित झाला आहे. ही अनिश्चितता दूर झाल्यानंतरच व्यापार सुरू होऊ शकतो.

हेही वाचा-अफगाण संकट : डेहराडूनमधील 83 अफगाण कॅडेटसचे भवितव्य अधांतरी

असा आहे भारत-अफगाणिस्तानमधील व्यापार

  • अफगाणिस्तान आणि भारतामध्ये 2020-21 मध्ये 1.4 अब्ज कोटींचा द्विपक्षीय व्यापार होता. हे प्रमाण 2019-20 मध्ये 1.52 अब्ज डॉलर होते. भारताने 2020-21 मध्ये 826 अब्ज डॉलर किमतीच्या उत्पादनांची निर्यात केली. तर 2020-21 मध्ये 510 दशलक्ष डॉलर किमतीच्या उत्पादनांची आयात केली होती.
  • अफगाणिस्तानमधून भारतात सुकविलेले मनुके, अक्रोड, चेरी, औषधी वनस्तपी, हिंग, ताजी फळे आणि विविध सुकामेव्यांची निर्यात करण्यात येते. भारतामधून अफगाणिस्तानला चहा, कॉफी, मिरची आणि कापसाची निर्यात होते.

संबंधित बातमी वाचा-तालिबानने भारतासोबतची आयात आणि निर्यात रोखली; सुक्या मेव्याचे भाव वाढण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये अत्यंत भयावह स्थिती -

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. काबूल विमानतळावरील नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती आहे. विमानतळावरील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

Last Updated : Aug 27, 2021, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details