नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) देशाच्या अंदाजित विकासदरात घट व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा ५.१ टक्के राहील, असा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. एडीबीने सप्टेंबरमध्ये देशाचा विकासदर हा ६.५ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.
चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ५.१ राहिल, असा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी २०१८ मध्ये बुडाल्याने वित्तीय क्षेत्रातील जोखीम वाढली आहे. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यात घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने रोजगार निर्मिती मंदावली आहे. तसेच शेतामधील पीककापणीचे प्रमाण कमी झाल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढल्याचेही एडीबीने म्हटले आहे. एडीबीने पुढील आर्थिक वर्षात ६.५ टक्के विकासदर राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे.