नवी दिल्ली– एशियन डेव्हलपमेंट बँकेने कोरोनाच्या लढ्याकरता भारताला 3 दशलक्ष डॉलर (22 कोटी रुपये) मंजूर केले आहेत. ही मदत एशिया पॅसिफिक आपत्कालीन निधीतून देण्यात येणार आहे. त्यामुळे भारताला कोरोनाच्या लढ्यात काहीसे आर्थिक बळ मिळणार आहे.
भारताला मिळणाऱ्या मदतीसाठी जपान सरकार अर्थसहाय्य करणार आहे. या मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग थर्मल स्क्रीनरची खरेदी आणि जीवनावश्यक वस्तुंचे बळकटीकरणासाठी करणे शक्य असल्याचे एडीबीने म्हटले आहे. कोरोनाच्या लढ्यात भारत सरकारला बळ देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मदत करण्यात येत असल्याचे एडीबीने म्हटले आहे. त्याचा उपयोग वेळीच रोगाचे निदान, संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि उपचारासाठी करता येणार आहे.