नवी दिल्ली - टाळेबंदीत ८९ टक्के लोकांचे आठवड्याचे उत्पन्न हे शून्य असल्याचे शिकागो विद्यापीठ आणि ब्रिटिश कोलंबिया रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाचा आधार घेत पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नोकऱ्यांच्या शोधात स्थलांतरित मजूर हे शहरात येतात. ते परतत असताना त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न असल्याचे पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संकटकाळात लोक त्यांच्या घरी परतण्यासाठी चालत जात आहेत. शहरात कोणीही अन्न देण्यासाठी नसल्याने त्यांना घरी जायचे असल्याचे अनेक स्थलांतरित सांगत आहेत.
हेही वाचा-आर्थिक पॅकेज : मनरेगाकरता अतिरिक्त ४० हजार कोटींची तरतूद
प्रत्येक गरीब कुटुंबाला आणि स्थलांतरित मजुराला तीन महिन्यांपर्यत मासिक पाच ते सात हजार रुपये द्यावे, असा विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी आणि वेणू श्रीनिवासन यांनी सरकारला सल्ला दिला आहे.