वॉशिंग्टन- अमेरिकेच्या ४४ प्रभावशाली लोकप्रतिनिधींनी भारताला व्यापार प्राधान्यक्रमाचा (जीएसपी) दर्जा देण्याची ट्रम्प सरकारला विनंती केली. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने भारत विकसनशील देश राहिला नसल्याची टीका करत जीएसपीचा दर्जा काढून घेतला आहे.
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथीजर यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तडजोडी न केल्याने अमेरिकन उद्योगांना भारतीय बाजारपेठ दीर्घकाळासाठी उपलब्ध होणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधील कार्यक्रमात भेटणार आहेत. यामध्ये दोन्ही देशामध्ये व्यापारामधील वाद आणि जीएसपीवर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-जीएसपी दर्जा काढून घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने दिली 'ही' प्रतिक्रिया