नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा चालना मिळण्याची कुठलीही संधी सध्या देशांना मिळत नाहीये. देशाबाबत बोलायचे झाल्यास, ४० दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
भारताचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) हा एका दिवसाला ८ अब्ज डॉलर्स आहे. त्यावरुन ४० दिवसांच्या हिशोबाने आतापर्यंत देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वाहतूक आणि हॉटेल क्षेत्रांतील दिग्गज ओयो, ओला आणि मेक माय ट्रिप अशा कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. आयएनसी-४२ या संस्थेच्या 'डेटालॅब्स'ने दिलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.