महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक - Corporation Bank

सरकारी बँकांच्या फसवणुकीच्या एकूण प्रमाणात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वात अधिक हिस्सा राहिला आहे. ही माहिती नीमूचमधील चंद्रशेखर गौर या सामाजिक कार्यकर्त्याने आरबीआयकडून मागविलेल्या माहिती अधिकारामधून समोर आली आहे.

प्रतिकात्मक - बँकिंग फसवणूक प्रकरण

By

Published : Sep 9, 2019, 4:10 PM IST

इंदूर - सरकारी बँकांचे विलिनीकरण होत असतानाच विविध बँकांची फसवणूक झाल्याचे माहिती अधिकारामधून समोर आले आहे.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 18 सरकारी बँकांची 2 हजार 480 प्रकरणात फसवणूक झाली आहे. या कर्जप्रकरणातील रकमेचा आकडा 32 हजार कोटी रुपये एवढा आहे. मात्र, नेमकी किती रकमेची फसवणूक झाली आहे, याची माहिती आरबीआयने 'आरटीआय'मध्ये दिली नाही.

सरकारी बँकांच्या फसवणुकीच्या एकूण प्रमाणात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वात अधिक हिस्सा राहिला आहे. ही माहिती नीमूचमधील चंद्रशेखर गौर या सामाजिक कार्यकर्त्याने आरबीआयकडून मागविलेल्या माहिती अधिकारामधून समोर आली आहे.

अलाहाबाद बँकेची 381 प्रकरणांमध्ये फसवणूक झाली आहे. त्यामध्ये 2 हजार 855.46 कोटींच्या रकमेचा समावेश आहे. फसवणूक झालेल्या बँकांत तिसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक आहे. पीएनबीची 99 प्रकरणात फसवणूक झाली आहे. यामधील कर्जप्रकरणे ही 2 हजार 526.55 कोटी रुपयांची आहेत.

हेही वाचा-वाहन उद्योगावर 'मंदीचे ग्रहण'; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग १० व्या महिन्यात घसरण

सामाजिक कार्यकर्त्याला दिलेल्या माहितीत आरबीआयने आरबीआयने फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती व ग्राहकांसह बँकांचे काय नुकसान झाले याची माहिती दिलेली नाही. बँक ऑफ बडोदाची ७५ प्रकरणामध्ये फसवणूक झाली आहे. त्यामध्ये २ हजार २९७.०५ कोटीच्या रकमेचा समावेश आहे.

हेही वाचा-सणाच्या मुहुर्तावर एसबीआयकडून दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात

अ.क्र बँकेचे नाव फसवणूक झालेली कर्जप्रकरणे कर्जप्रकरणातील एकूण रक्कम
1 ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स 45 2,133.08 कोटी रुपये
2 कॅनरा बँक 69 2,035.81 कोटी रुपये
3 सेंट्रल बँक ऑफ इंडिया 194 1,942.27 कोटी
4 युनायटेड बँक ऑफ इंडिया 311 196.19 कोटी
5 इंडियन ओव्हरसीज बँक 16 960.80 कोटी रुपये
6 सिंडिकेट बँक 54 795.75 कोटी रुपये
7 युनियन बँक ऑफ इंडिया 51 753.37 कोटी रुपये
8 बँक ऑफ इंडिया 42 517 कोटी रुपये
9 युको बँक 34 470.74 कोटी रुपये
10 अलाहाबाद बँक 381 2855.46 कोटी रुपये
11 पंजाब नॅशनल बँक 99 2526.55 कोटी रुपये
12 बँक ऑफ बडोदा 75 2297.05 कोटी रुपये

हेही वाचा- वाढते अपघात कमी करणे हा वाहतुकीचे नियम कठोर करण्याचा उद्देश

ABOUT THE AUTHOR

...view details