नवी दिल्ली- ग्राहकांना ऑनलाईन अन्नपदार्थ घरी पोहोचविण्याची सेवा देणाऱ्या झोमॅटोने ग्राहकांकरिता भन्नाट ऑफर आणली आहे. या सेवेमधून ग्राहकांना अमर्यादित थाळी (इन्फिनिटी डायनिंग) देण्यात येणार आहे.
झोमॅटो ग्राहकांना देणार 'अमर्यादित थाळी', ही आहे भन्नाट ऑफर - इनफिनिटी डायनिंग
अमर्यादित थाळीची ही सेवा गोल्ड मेंबरशिप असलेल्या ग्राहकांना देण्यात येणार आहे. ज्या रेस्टॉरंटबरोबर झोमॅटोने भागीदारी केली आहे, त्याच रेस्टॉरंटमध्ये ही सेवा मिळणार आहे.
अमर्यादित थाळीची सेवा ही गोल्ड मेंबरशिप असलेल्या ग्राहकांना देण्यात येणार आहे. ज्या रेस्टॉरंटबरोबर झोमॅटोने भागीदारी केली आहे, त्याच रेस्टॉरंटमध्ये ही सेवा मिळणार आहे. झोमॅटोने प्रारंभिक ऑफर म्हणून दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील ३५० रेस्टॉरंटबरोबर करार केला आहे. या सर्व हॉटेलला कमीत कमी ३.५ मानांकन वापरकर्त्यांनी दिलेले आहे.
झोमॅटो गोल्ड मेंबरशीपच्या १०० टक्के वाढ झाल्याचे झोमॅटोचे सहसंस्थापक तथा चिफ ऑपरेटिंग ऑफिसर गौरव गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, जगभरातील नऊ देशामध्ये १.२५ दशलक्षहून अधिक लोकांनी गोल्डचे सभासदत्व (मेंबरशीप) स्विकारले आहे. या क्षेत्रात कधीही न संपणाऱ्या संधी आहेत. अमर्यादित थाळीची सेवा देणारा भारत हा पहिला देश ठरणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.