महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

झोमॅटोसह स्विग्गीवरून देण्यात येणाऱ्या सवलतीला चाप लागण्याची शक्यता - झोमॅटो

दिल्ली, मुंबईसह काही महानगरामधील हॉटेल व्यवसायिकांनी ऑनलाईन फूड अॅपविरोधात  लॉगआऊट मोहीम राबविली होती. त्यानंतर नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) हॉटेल व्यवसायिकाबरोबरील वाद मिटवावा, अशी सूचना ऑनलाईन फूड कंपन्यांना केली होती.

झोमॅटो

By

Published : Aug 20, 2019, 7:34 PM IST

नवी दिल्ली - ऑनलाईन फूड अॅपमधून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळत असल्याने अनेकांना जेवण अथवा इतर खाद्यपदार्थ मागविण्याची सवय असते. या सवलती आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण सवलतीच्या दरात बदल करण्याची तयारी झोमॅटोसह स्विग्गीने हॉटेल उद्योगांची संघटना एआरएआयकडे दाखविली आहे.

दिल्ली, मुंबईसह काही महानगरामधील हॉटेल व्यवसायिकांनी ऑनलाईन फूड अॅपविरोधात लॉगआऊट मोहीम राबविली होती. त्यानंतर नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) हॉटेल व्यवसायिकाबरोबरील वाद मिटवावा, अशी सूचना ऑनलाईन फूड कंपन्यांना केली होती.

हा आहे हॉटेल व्यावसायिकांचा आक्षेप
हॉटेल व्यावसायिक त्यांच्या हॉटेलची नावे हॉटेल झोमॅटो गोल्ड, इझीडिनर, डाईनआऊट, गारमेट पासपोर्ट, निअरबायच्या यादीमधून काढत आहेत. या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात भरघोस सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना सवलतींची सवय लागत असल्याचा आक्षेप एनआरएआयचे अध्यक्ष राहुल सिंह यांनी घेतला आहे. ऑनलाईन फूड कंपन्या त्यांच्याकडील तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांची आवड समजून घेतात. त्याप्रमाणे स्वत: मेनू तयार करून मोठ्या सवलतीत विक्री करतात, असा आरोप हॉटेल संघटनांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details